India, 23 June 2020: Apeksha Films & Music has always aimed to provide platform and support to...
Breaking News
Pracheen Kala Kendra has been one of the pioneers of India to organize regular concerts all over...
गझल सम्राट पंकज उधास यांचे अपेक्षा म्युझिक साठी पहिलेवहिले पाऊसगाणे वर्षा ऋतूला सुरुवात झाली आणि हा पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अपेक्षा म्युझिक’ तर्फे सुद्धा नवीन पाऊसगाणेआले आहे. गझल सम्राट पंकज उधास आणि मधुर आवाजाची गायिका कविता पौडवाल या दोघांच्या स्वरात ‘रंगधनूचा झूला’ हे पाऊसगाणे वर्षाऋतुतील प्रेम अधिक गहिरे करणार आहे . हा पाऊस खास आहे कारण जेव्हा पावसाची रिमझिम बरसात होते ,तेव्हा ऊर्जादायक इंद्रधनुष्य तुमच्याशी संवाद साधतेआणि प्रेमाच्या लहरी पसरवते. पावसामध्ये सर्वात चांगली गोष्ट कोणती तर चांगले संगीत ऐकणे . पावसाच्या गीतांमध्ये नेहमीच प्रेमगीतांना महत्वाचे स्थान असते. ‘रंगधनूचा झूला’ हे पावसातील प्रेमगीत नक्कीच प्रेमाचासंदेश देणारे ठरेल. या संदर्भात ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ चे अजय जसवाल म्हणतात, “संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्यानिमित्ताने ‘रंगधनूचा झूला’ हे महत्वाचे गीत प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे आवडते गायक गझलउस्ताद पंकज उधास यांनी मराठी भाषेत गायलेले हे पहिले पाऊसगाणे आहे. कविता पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी सुद्धा यायुगुलगीताला साज चढवला आहे. म्हणूनच पावसाच्या गाण्यांच्या यादीत हे सुंदर गीत असलेच पाहिजे.” गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास त्यांच्या मराठी भाषेतील या पहिल्या गीताबद्दल म्हणतात, “मराठी भाषेत गाणे गाण्याचेमाझे स्वप्न होते आणि या गाण्याच्या निमित्ताने हे पूर्ण झाले. हे गीत मराठीतील दिग्गज संगीतकार अशोक पत्की यांनीसंगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून हे गीत साकारले आहे. हे गीत उत्कृष्ट प्रेमगीतअसून कविता पौडवाल यांच्याबरोबर मी ते गायलं आहे. संगीत प्रेमींना हे गीत कायम लक्षात राहिल. मराठी गीत गाण्याचेमाझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ‘अपेक्षा म्युझिक’ यांना धन्यवाद देतो.” गायिका कविता पौडवाल त्यांचा आनंद व्यक्त करताना म्हणाल्या, “मी माझ्या ‘रंगधनूचा झूला’ या गाण्याबद्दल बरीचउत्सुक आहे. हे मराठी युगुलगीत मी गझल उस्ताद पंकज उधास यांच्याबरोबर गायले आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे गीतभाषेचे सर्व अडथळे दूर करेल आणि जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. पंकजजी यांचे हे पहिले मराठीगीत असल्याने या गीताला एक वेगळे महत्व आहे आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच योग्य प्रकारे पोहचेल. ‘अपेक्षा म्युझिक’ या निर्मिती संस्थेचा कायमच दर्जेदार गोष्टींवर विश्वास आहे आणि त्यामुळे असे उत्तम गाणे चाहत्यांपर्यंतपोहचवण्यात ‘अपेक्षा म्युझिक’ हा उत्तम पर्याय आहे.” ‘रंगधनूचा झूला’ याला संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिले आहे आणि गीतकार मंदार चोळकर यांनी हे गीतलिहिले आहे. या गाण्याचा व्हिडीओ प्रशांत श्याम सुर्वे यांनी दिग्दर्शित केला आहे. पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठीआणि हे गाणे ऐकताना गझल सम्राट पंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या स्वरात चिंब भिजण्यासाठी ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ ही संस्था सर्वांना घरी राहा आणि सुरक्षित राहा अशी विनंती करून सर्वांना पावसाचे अँथम’रंगधनूचा झूला’ या पाऊसगाण्याचा आनंद घ्या, असे सांगत आहे. ...
With the UAE being hit by the massive COVID-19 pandemic, Indian migrants in the UAE are queuing...
A new single ‘Mainu Chad Ke’ music video is released, directed by Shivam Khurana. The song is...
“India will serve as the pharmacy of the world; we will be truly ‘AtmaNirbhar’ in pharma and...
मुम्बई से 1230 श्रमिकों को लेकर,लखनऊ के लिये रवाना हुईं श्रमिक स्पेशल ट्रेन मुम्बई से 25 मई...